जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी येथील एका दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील श्रीरामपेठ भागात असलेल्या संदीप किराणा दुकान मालक शैलेश प्रकाश जैन हा व्यापारी रेशम मांजावर बंदी असतानाही त्याच्या मालकीची संदीप किराणा दुकानावर रेशम माजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित दुकानदारावर किराणा दुकानावर रंगीबेरंगी नायलॉन रेशीम मांजा विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुकानावर जाऊन कारवाई केली आहे.
यावेळी पोलिसांना सुमारे एक हजार रुपये किमतीचा रंगीबेरंगी नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधित व्यापार्यावर राजू नामदेव तायडे पोलीस नाईक दिलेल्या फिर्यादीवरून ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क जयंत पगारे करीत आहेत.