जामनेर येथील ग्रामपंचायतीची उद्या होणार मतमोजणी

जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बारा ग्रामपंचायतसाठी दि.18 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून दिनांक 20 रोजी या सर्व ग्रामपंचायत मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये दोन टप्प्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

सकाळी साडेनऊ वाजता पहिल्या टप्प्यातील करमाड खादगाव पळासखेडा बुद्रुक मोहाडी मालदाभाडी राजनी या गावाची मतमोजणी होणार असून अकरा वाजून 45 मिनिटांनी दुसऱ्या टप्प्यात चिंचखेडा बुद्रुक हिंगणे बुद्रुक कोदोली ग्रामपंचायत टाकळी खुर्द सोनारी या गावाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी उमेदवारांनी स्वतः यावे व त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रतिनिधीने मोबाईल सोबत आणू नये जर असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, त्याच बरोबर महिला उमेदवार असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईक यांनी यावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

Protected Content