गंधर्व कॉलनीतून ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गंधर्व कॉलनी येथील संकेत अपार्टमेंटच्या वॉलकंपाऊंड जवळून पार्किंगला लावलेली ट्रॅक्टर व ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजय वसंतराव कुलकर्णी (वय-५५) रा. संकेत अपारमेंट, बालगंधर्व कॉलनी, जळगाव हे आपले लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांचा मालकीचा ट्रॅक्टर व ट्रॉली अपार्टमेंटच्या वॉलकंपाऊंड जवळ पार्किंगला लावलेला होता. शनिवारी १७ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेला ट्रॅक्टर हा ट्रॉलीसह चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु ट्रॅक्टर व ट्रॉलीचा कुठलाही शोध लागला नाही, अखेर रविवार १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक वंदना राठोड करीत आहे.

Protected Content