मजूराच्या घरातून दोन मोबाईलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रजापत नगरातील सुनंदिनी नगरात असलेल्या एका पार्टेशनच्या घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश रघुनाथ सोनवणे (वय-४०) रा. सुनंदिनी नगर, प्रजापत नगर, जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटरचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण झोपले होत. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले १२ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे सकाळी ४ वाजता उघडकीला आले. त्यांनी परिसरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला, परंतु दोन्ही मोबाईल मिळून न आल्याने अखेर रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.

Protected Content