जामनेर तालुक्यात दोघे पॉझिटिव्ह ; शहरात चर्चेला विराम

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझेटीव्ह आला आहे. एक व्यक्ती पाळधी येथे क्वारंटाईन केलेल्यांपैकी आहे. तर दुसरा जामनेरचा असल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून तालुक्यात होती. परंतु, तो रुग्ण दुसरा निघाल्याने जामनेरकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

पळासखेडा येथील पॉझेटीव्ह आलेल्या पोलिसाच्या संपर्कात आलेला त्याचा जामनेर पुऱ्यावरील शास्त्रीनगरचा मेव्हना, एका व्यापाऱ्याकडचा हमाल असे तर्क जावले जात होते. तर जिल्हा रूग्णालयाकून प्रसिध्द झालेल्या यादीत संपुर्ण नाव पत्ता नसल्याने संभ्रमावय्था होती. मात्र पॉझेटीव्ह अहवाल आलेल्या दुसऱ्या रूग्णाचा १८ रोजी जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. हा व्यक्ती शेंदुर्णीजवळील दोंडवाळ्याचा असल्याची माहती वैद्यकीय सुत्रांनी दिली. त्यामुळे पळासखेडा व जामनेरकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Protected Content