जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १३ मे रोजी दुपारी ३ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास गावात राहणारा अनिल सरीचंद चव्हाण आणि ईश्वर श्रावण चव्हाण हे दोघे महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १३ मे रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी अनिल सरीचंद चव्हाण आणि ईश्वर श्रावण चव्हाण या दोघांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत करणारे करीत आहे.