जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय महिलेचा विनयभंगा केल्याचा प्रकार उघडकीला आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिला घरी असताना गावात राहणारा ईश्वर राजाराम गायकवाड हा घरी येऊन तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच आरडा ओरड केली तर तुला जिवंत मारून टाकीन अशी धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाह महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेला तक्रारीवरून रात्री ८ वाजता संशयित आरोपी ईश्वर राजाराम गायकवाड यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करीत आहे.