जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा मध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी हिवरखेडा येथील समाजसेवक तुषार पाटील यांच्याकडून सुमारे 3 हजार झाडे शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
आपण सगळ्यांना झाडांपासून मोठ्या प्रमाणावर फायदे आहे. आपण आज वृक्ष लावतो. मात्र जगवण्याचे जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला या वृक्षापासून अनेक फायदे होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी झाडे लावण्यासोबत जगण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन वृक्ष वाटप व लागवड कार्यक्रमात प्रसंगी बोलताना समाजसेवक तुषार पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम 23 जुलै रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये पार पडला असून तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी अशा 255 शाळांमध्ये प्रत्येकी शाळेला 10 झाडे वाटप करण्यात येणार असून ही झाडे लागवड करून जगवण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली आहे. सदर जिल्हा परिषद शाळा व उर्दू शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात समाजसेवक तुषार पाटील, पी.के. पाटील सेवानिवृत्त अभियंता शिक्षण विभागाचे विजय सरोदे, केंद्रप्रमुख खेमराज नाईक इस्माईल, संदीप पाटील, अंभोरे नमन फाउंडेशनचे दशरथ पाटील, मयूर पाटील, राहुल मुळे, योगेश पाटील, संतोष तेली, भूषण कानडदे त्याचबरोबर विविध शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यावेळी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.