जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चारही राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला बहुमताने सत्तेत आणल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका व शहराच्या वतीने शहरातील नगरपालिके समोरील राजमाता जिजाऊ चौकात फटाक्यांची आतीषबाजी करून व पेढ़े वाटून जल्लोष व आनंदोस्तव साजरा करण्यात आला.
आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी चार राज्यातील भाजपच्या विजयाचे फटाके फोडून जल्लोष करून विजय साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते प्रशांत भोंडे, शिवाजी नाना सोनार ,श्रीराम महाजन, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील ,नाना वाणी, दीपक तायडे , संतोष बारी, रमेश नाईक , डॉ. संजय पाटील, गणेश चौधरी ,जालम सिंग राजपूत, कैलास पालवे, सुभाष पवार, विजय शिरसाट, सुहास पाटील, तेजस पाटील, धोंडू आप्पा पाटील, कैलास नरवाडे,अनिस शेख, अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, दीपक महाराज, कैलास पालवे, निलेश चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.