चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जामडी गावातील नाल साहब बाबाची दर्गा हलत असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर भाविकांनी त्याठिकाणी एकच गर्दी केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेकडे गावातील नागरिक श्रद्धा-अंधश्रद्धेच्या दृष्टीकोनातून बघत असून आहे. परंतू दर्गा हलत असल्याची गोष्ट पसरताच गावात चर्चेला एकच उधाण आले होते.
जामडी गावात असलेला नाल साहब बाबा नावाच्या बाबांचा दर्गा गेली अनेक वर्षापासून गावात आहे. गावातील हिंदू-मुस्लीम बांधव आपापल्या पद्धतीने पूजाअर्चा करतात. दिनांक १५ जुलै रोजी रात्री या दर्ग्याजवळ काहीतरी हालचाल सुरु असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना दिसून आले. त्यानंतर परिसरातील नागरिक दर्ग्याजवळ गेले असता त्यांना दर्ग्यावरील थडगे अचानक हलत असल्याचे दिसले. काही लोकांनी त्याची मोबाईलमध्ये शुटींग केली. मात्र ही दर्गा अचानक का हलायला लागली? याचे कारण काय हा सर्वांसमोर प्रश्न निर्माण झाला. काही लोक अंधश्रद्धेपोटी बाबा उठून बसणार आहेत किंवा बाबा उठत आहेत, अशा चर्चा करायला सुरुवात केली. काहींच्या मते कोरोना महामारीमुळे काही वेगळा प्रकार आहे का? असे तर्क वितर्क श्रद्धा-अंधश्रद्धेच्या चर्चांना उधाण आले. मात्र दर्गा खरच हलली की नागरिकांना भास झाला? याचे शास्त्रीय दृष्ट्या खुलासा होऊ शकला नाही.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2401267650174797/