भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील जाडगाव येथे पारंपरिक विवाह सोहळ्याला फाटा देऊन मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आदर्श विवाह पार पडला.
भुसावळ येथील रघुनाथ किसन कोळी( राहणार चांगदेव हल्ली मुक्काम आनंद नगर भुसावळ)यांचे द्वितीय सुपुत्र इंजिनीयर चिरंजीव श्रीकांत रघुनाथ कोळी व जाडगाव येथील शेतकरी प्रकाश दगडू सोनवणे यांची द्वितीय सुकन्या चि. सौ का स्वाती यांचा शुभविवाह दिनांक आठ मे रोजी भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथे मोजक्या लोकांच्या साक्षीने पार पडला. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे वर हा सिव्हिल इंजिनिअर असूनही त्याने एक सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीशी कुठलाही हुंडा न घेता विवाह केला. यावेळी वर पक्षाकडून उपस्थितांना सॅनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी वराचे वडील रघुनाथ किसन कोळी यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून कसा बचाव करता येईल याबद्दल सर्व उपस्थितांना माहिती दिली. व कोळी समाजातील ज्यांचे विवाह ठरले आहेत त्या सर्वांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलता सोशल डिस्टन्स इन चे सर्व नियम पाळून कुठलाही बडेजाव न करता अनावश्यक खर्च टाळून घरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह संपन्न करावेत. असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. यावेळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टनसिंग ठेवण्यात आलेला होता. यावेळी विवाह सोहळ्याला लागणारा अनावश्यक खर्च रक्कम वधू-वरांच्या भावी आयुष्यासाठी बँक डिपॉझिट करण्यात येणार आहे. असे भुसावळ येथील वराचे वडील रघुनाथ किसन कोळी यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००