जळगाव, प्रतिनिधी । महापालिका व केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित शहरी बेघर निवारा केंद्रातर्फे दि. १० आक्टोबंर जागतिक बेघर दिनानिमित्त १ ते १० ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
जागतिक बेघर दिनानिमित्तानाच्या पार्श्वभूमीवर शहरी बेघर निवारागृहच्या वतीने रात्री ७ ते १० दरम्यान दोन टिम द्वारे जळगाव शहरात सर्वेक्षण करण्यात आले. व बेघराना माहिती देवून समजवून तयार झालेल्याना केन्द्रात आणण्यात आले. सदर सर्वेक्षण गायत्री पाटिल,एनयूएलएम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा, संचालक कादरभाई मेमन, दुर्गेश वाणी, काळजीवाहक मनिषा पारधी, राजेन्द्र मराठे, प्रदिप पाटील व सुनिल भामरे ह्यानी केले.