जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा जाखनीनगरात दागिने परत मागण्याच्या कारणावरून जवायाला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कपिल दिलीप बागडे (वय-३२) रा. कंजरवाडा, जाखनी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच भागात त्यांचे सासरे महेश वजीर माचरे हे परिवारासह राहतात. कपिल बागडे यांनी सासरे महेश माचरे यांना कर्ज फेडण्यासाठी दागिने दिले होते. ते दागिने परत मागितल्याचा राग आल्याने सासरे महेश वजीर माचरे यांच्यासह इतरांना कपिल बागडे याला बेदम मारहाण केली. यातील एकाने हातातील लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी कपील बागडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात महेश वजीर माचरे, सोहन महेश माचरे, निलेश महेश माचरे, निकिता दिलीप बागडे, नुरी महेश माचरे, हिना सचिन बागडे सर्व रा. कंजरवाडा जाखनी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.