कोल्हे हिल्स परिसरातून कारची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरातून अज्ञात चोरट्यांनी ३ लाखाची कार चोरून नेली आहे. याप्रकरणी मंगळवार १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कोमल एकनाथ पाटील (वय-३२) रा. माऊली नगर, कोल्हे हिल्स परिसर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १४ जेएम ३६२८) क्रमांकाची कार आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या घराचा समोर असलेल्या ओपन स्पेसमध्ये कार पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रूपये किंमतीची कार चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु कार कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवार १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील करीत आहे.

Protected Content