डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाचा ‘वाचन कट्टा’ वर्धापनदिन उत्साहात (व्हिडिओ)

jalgaon

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयाचा आज (दि.२) वाचन कट्टा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी अधिक वाचन करावे, वाचनाची सवय लागावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी 1 डिसेंबर रोजी वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली होती. या एका वर्षात अनेक पुस्तके मुलांनी वाचली. पुस्तकासारखा नवीन मित्र त्यांना भेटला असावा. ‘वाचता वाचता मिळते ज्ञान, अनुभव हाच गुरू महान’ या वेळी प्रमुख अतिथीनी मुलांना मार्गदर्शन केले. आणि विद्यार्थ्यांनी ही वाचन कट्ट्याविषयी आपले मनेागत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एम.जे.कॉलेज येथील प्राध्यापक गणेश सूर्यवंशी, सकाळ वृत्तपत्रच्या एनआएबी प्रमुख हर्षदा नाईक, विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष हेमाताई अमलकर, मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खुशी नेमाडे व भावीक सोनगीरे या विद्यार्थ्यांनी केले.

Protected Content