जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात वेगवेगळ्या तीन घटनेत दुचाकी चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिभुवन कॉलनीत राहणोर मनोज सुरेश मराठे (वय-३५) यांनी घराबाहेर दुचाकी २३ जून रोजी पार्किंगला लावलेली दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीजी ८१५९) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सकाळी आजूबाजूला पाहणी केली तरी मिळून आली नाही. मनोज मराठे यांच्या फिर्यादीवरून १ जुलै रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.
दुसऱ्या घटनेत धिरज प्रकाश पाटील (वय-३०) रा. गुजराल पेट्रोल पंप, ओम शांती नगर, कस्तूरी सुपर शॉपच्या मागे हे एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील कंपनीत कामाला आहे. एमआयडीसीतील व्ही सेक्टर १४२ मधील एस.फिटवेल कंपनीच्या गेटसमोर ३० जून रोजी सकाळी ९ वाजता गेटसमोर हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी पार्किंगला लावली. अज्ञात चोरट्यांने २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लक्षात आले. धिरज पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञातचोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास इम्रान सैय्यद करीत आहे.
तर तिसऱ्या घटनेत कि, किसन नामदेव जगताप (वय-५७) रा. वल्लभ नगर हौ.सो. संतमीराबाई नगर जळगाव यांची दुचाकी ज्यूपीटर मोपेड दुचाकी (एमएच १९ सीके ९००५) त्यांच्या गल्लीतील सपकाळे यांच्य चक्कीजवळ १९ जून रोजी रात्री ८.३० वाजता लावली होती. अवघ्या १५ मिनिटा म्हणजे ८.४५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची चोरी केली. आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. किसन जगताप यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.