शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ; २८ मंत्र्यांनी घेतली शपथ

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मंत्रीमंडळाचा आज दुसरा विस्तार करण्यात आला. राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. एकूण २८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपामधील त्यांचे समर्थक असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

 

भाजपाच्या मध्य प्रदेशातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाकडे समर्थकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी शिंदेंनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यावर चर्चाही सुरू होती. अखेर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेटचा विस्तार केला असून, आता २८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. राजभवनात राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. गोपाल भार्गव, विजय शाह, जगदीश देवडा, बिसाहूलाल सिंह, यशोधरा राजे सिंधिया, भूपेंद्र सिंह, एंदल सिंह कसाना, बृजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, प्रद्युम्न सिंह तोमर, ओम प्रकाश सकलेचा, उषा ठाकुर, प्रेम सिंह पटेल, हरदीप सिंह डंग, महेंद्र सिंह सिसोदिया, अरविंद सिंह भदौरिया, डॉ. मोहन यादव आणि राज्यवर्धन सिंह यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर भारत सिंह कुशवाहा, इंदर सिंह परमार, रामखेलावन पटेल, रामकिशोर कांवरे, बृजेंद्र सिंह यादव, गिरिराज डंडोदिया, सुरेश धाकड आणि ओपीएस भदौरिया यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, शपथविधीनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले.

Protected Content