जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील विमानतळाला महर्षी वाल्मिकी नागरी उड्डाणस्थळ नाव देण्याची मागणी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता निवेदन देण्यात आले आहे.
अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील कुसुंबा येथील विमानतळाच्या प्रवेशद्वाराला जळगाव विमानतळ अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात कुसुंबा शिवारातील विमानतळाचे सुरुवातीलाच कविवर्य महर्षी वाल्मिकी नागरी उड्डाणतळ असे नामकरण झालेले आहेत. या संदर्भात २३ सप्टेंबर २००२ च्या तत्कालीन जळगाव नगरपालिका नगराक्षांनी नगरपालिका ठरावात कविवर्य महर्षी वाल्मिकी नागरी उड्डाणतळ असे नाव देण्यासाठी मंजूर दिली होती.
कविवर्य महर्षी वाल्मिकी नागरे उड्डाणतळ असे आशयाचा फलक त्वरित लावण्यात यावा केली असून हे नाव बदलविणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर कोळी समाजाचे प्रदेश सचिव अनिल नन्नवरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण बाविस्कर, युवक जिल्हाध्यक्ष धनराज साळुंखे, उपाध्यक्ष सुखदेव रायसिंग, भिकन नन्नवरे, जिल्हा संघटक भरत सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता झाल्टे, वकील संघटनेचे अध्यक्ष रमाकांत सोनवणे, अनिल कोळी, रवींद्र कोळी, आत्माराम कोळी, रोहिदास ठाकरे, राहुल रायसिंग, रवींद्र पाटील, मनोज सपकाळे, राजू पहेलवान, नारायण सपकाळे, राजकुमार पेंटर, राज सपकाळे यांच्यासह कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.