जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील ईलेक्ट्रीक डीपीला मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. दरम्या वीजपुरवठा खंडीत करून ही आग विझविण्यात आली आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील विद्यूत डीपीला मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचा जवान हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या परिसारातील वीजपुरवठा खंडीत करून ही आग विझविण्यात आली. त्यानंतर ही आग नियंत्रणात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.