जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत धनाजी महाविद्यालयाने बाजी मारली

फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात फ्रिस्टाईल व ग्रिको रोमन आणि महिला गटात फ्रिस्टाईल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी सर हे उपस्थितीत होते. प्रमुख उपस्थितीत जीमखाना समिती चेअरमन प्रा. डॉ. सतीश चौधरी सर, प्रा. किशोर वाघ, प्रा. डॉ.मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील, प्रा. डॉ. भरत चालसे, प्रा. डॉ.अरविंद कांबळे, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. डॉ. चाँद खा सर, प्रा. डॉ. नवनित असी, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चित्ते सर, प्रा. डॉ. अमोल पाटील आदि उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सुरूवातीला कै. विपुल बोरोले व कै. प्रा. मिलिंद चौधरी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली व अगदी साधेपणाने उद्घाटन समारंभ घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी सर यांनी मधुस्नेह परिवारातील दोन व्यक्तींच्या जाण्यामुळे संपूर्ण मधुस्नेह परिवार हा दोन्ही कुटुंबीयांसमवेत असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना एक महत्वपूर्ण सलादिलाकी कुस्ती सारख्या खेळातून नर्सिंग यादव, विजय चौधरी सारखे मल्ल महाराष्ट्रात पोलीस उपअधीक्षक झाले त्या मुळे सर्वांनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळाचा नियमीत सराव करून आपले, राज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्या बदल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात (फ्रिस्टाईल) प्रथम क्र. पी. ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ, व्दितीय क्र. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जामनेर व तृतीय क्र. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर तसेच ग्रिको रोमन पुरुष गटात प्रथम क्र. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, द्वितीय क्र. अ. भा. गरूड महाविद्यालय, शेदुर्णी व तृतीय क्रमांक. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर आणि महिला गटात प्रथम क्र. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, द्वितीय क्र. अ. भा. गरूड महाविद्यालय, शेदुर्णी व तृतीय क्रमांक. नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव हे विजयी झाले.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी एरंडोल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. किशोर वाघ, भानुदास आरखे आणि आनिल मराठे यानी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले तर आभार प्रा. दिलीप बोदडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. सतिश चौधरी सर, प्रा. डॉ. गोविंद मारतळे राजेंद्र ठाकुर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content