जळगाव महापालिकेची शनिवारी विशेष महासभा

जळगाव । मनपाला मुख्यमंत्री यांनी दिलेल्या 100 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून होणार्‍या कामांना मंजुरीसह महापालिका जागेवरील विकास दूध बुथ विक्री केंद्रांना मुदतवाढ देण्यास मंजुरीसाठी शनिवारी सकाळी 11 वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महासभेत 100 कोटी रुपयांच्या कामांना मान्यतेव्यतिरीक्त प्रभाग समिती सभापतींची निवड देखील या सभेत होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी विकासकामांना मंजूरी देवून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करण्यावर सत्ताधारी भाजपाचा भर आहे. दरम्यान याबाबत आ. सुरेश भोळे यांनी सर्व नगरसेवकांकडून आपआपल्या प्रभागातील करावयाच्या कामांचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार एकूण 175 कोटी व रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मनपाकडे प्राप्त झाले असून शहरातील मुख्य रस्ते, गटारंसह स्वच्छतेच्या विषयांवर चर्चा करण्यात येवून कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे आ. राजुमामा भोळे यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content