जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरघर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या सौजन्याने आयोजित जळगाव ते अमळनेर सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले.
स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद विद्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जळगाव ते अमळनेर सायकल रॅलीचे म्हसावद येथे स्वागत करण्यात आले. रॅलीच्या स्वागतासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. सोनार, उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव , ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख योगराज चिंचोरे, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण व विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. सायकल रॅलीतील सहभागींचे गुलाब पुष्प देऊन व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तसेच भारत माता की जय ,वंदे मातरम् , भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.