जळगाव तालुक्यात २८ सरपंच खुल्या प्रवर्गातून

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यासाठी सरपंचपदासाठी आज आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृहात ईश्वर चिट्ठी काढून काढण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार नामवेद पाटील, मंडलाधिकारी योगेश नन्ववरे, जळगाव ग्राम विस्तार अधिकारी नीलकंठ ढाके उपस्थित होते. ईश्वर चिट्ठी मंडलाधिकारी योगेश नन्ववरे यांचे सुपुत्र सम्यक योगेश नन्ववरे यांनी काढली.

जळगाव तालुक्यातील प्रवर्गानुसार आरक्षित गावे पुढील प्रामाणे

अनुसूचित जाती पदासाठी आरक्षित गावे (६)

रायपुर, विदगाव, तरसोद, वावडदे-बिलखेडा, पाथरी, म्हसावद

अनुसूचित जमाती (१७)
आसोदा, वडली. शिरसोली प्र न, धानवड, जवखेडा, नशिराबाद, सुजदे, भोलाणे, घाडी, रिधुर, देऊळवाडे, फुपणी, करंज, पिलखेडे, धामणगाव, शेळगाव, आवार

नागरिकांचा मागास प्रवर्ग (१९)
गाढोदे महिला जनरल, नांद्रा बु., भादली बु. अनुसूचित जाती महिला, कंडारी, चिंचोली महिला जनरल, आव्हाणे, लामंजन, शिरसोली प्र. बो. अनुसूचित जमाती महिला, खेडी खु. महिला जनरल, ममुराबाद अनुसूचित जमाती महिला, जळके अनुसूचित जमाती महिला, डोमगाव, रामदेववाडी महिला जनरल, चीत्ठीद्वारे सुभाषवाडी, जामोद, उमाळे, मोहाडी, सावखेडा खु. बोरनार

सर्व साधारण पदाच्या सरपंच पद (२८)
सावखेडा बु. महिला अनुसूचित जमाती, दापोरे महिला इतर मागासवर्गीय, धानोरे बु. महिला जनरल, कानळदा महिला इतर मागासवर्गीय, डिकसाई, कठोरा, भोकर, जळगाव खु. महिला अनुसूचित जाती, मन्यारखेडे, कुसुंबे खु. कडगाव, वडनगरी महिला जनरल, नांद्रा खु. किनोद महिला इतर मागासवर्गीय, भादली खु., वसंतवाडी महिला इतर मागासवर्गीय, वराड बु. विटनेर, पळसोद, निमगाव बु. महिला इतर मागासवर्गीय, बिलवाडी महिला इतर मागासवर्गीय, लोणवाडी बु. महिला अनुसूचित जमाती, नांदगाव, आमोदे बु. महिला इतर मागासवर्गीय, बेळी महिला इतर मागासवर्गीय, फुपनगरी, तुरखेडे, कुवारखेडे

Protected Content