जळगाव प्रतिनिधी । आज आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ७७३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात आज पुन्हा अमळनेर तालुक्यात तब्बल १९६ रूग्ण आढळून आलेत. तर जळगाव रावेर-७५, पाचोरा-७४, चोपडा-६९ असे रूग्ण आढळून आले आहेत. आजच ४६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ७७३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १९६ रूग्ण हे अमळनेर तालुक्यात आढळून आले आहेत. जळगाव रावेर-७५, पाचोरा-७४, चोपडा-६९ असे रूग्ण आढळून आले आहेत.
आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-४३; जळगाव ग्रामीण-५; भुसावळ-६८; अमळनेर-१९६; चोपडा-६९; पाचोरा-७४; भडगाव-१६; धरणगाव-२९; यावल-३८; एरंडोल-३६, जामनेर-४४; रावेर-७५; पारोळा-३६; चाळीसगाव-२५; मुक्ताईनगर-६, बोदवड-१० व दुसर्या जिल्ह्यांमधील १ असे एकुण ७७३ आढळून आले आहेत.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ३२ हजार ४३३ इतकी झालेली आहे. यातील २२ हजार ८२६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ४६३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १३ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८७० इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ८ हजार ७३७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews