जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशन फलकाचे पालकमंत्री ना. पाटील यांच्याहस्ते अनावरण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना तालुक्यातील उमाळे येथील नवीन एमआयडीसी परिसरात आज करण्यात आली. असोसिएशनच्या पलकाचे अनावरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना माझ्या हस्ते झाली असून मी स्वतःला भाग्यशाली समजतो. असोसिएशनच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी माझ्यासमोर मांडल्या आहेत. त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

उद्योजकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याच्या उद्देशाने असोसिएशनची स्थापना केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागात इंडस्ट्रीज वाढवून स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आमचे उद्देश असून आम्हाला येणाऱ्या अडचणी पालकमंत्री या नात्याने गुलाबराव पाटील नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, खजिनदार राजीव बियाणी आदींसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3580805178630095/

Protected Content