जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावातील येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय विष्णू नमायते (वय-४२) रा. जळगाव खुर्द ता.जि.जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संजय निमायते हे जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. रविवारी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंत मयत घोषीत केले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात रविवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.