जळगाव अशांत करणाऱ्या मास्टर माईंड ला अटक करा-पोलीस अधीक्षकांना साकडे

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  शहरात कट कारस्थान रचून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटकांचा व त्यांचा मास्टरमाईंड तो कोणत्याही समाजाचा असो त्याच्यावर पोलिसांनी त्वरित कडक कारवाई करावी व त्याचा कट कारस्थान पोलिसांनी उलथवून लावावा अशी एक मुखी मागणी जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधीनी पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांची भेट घेऊन करण्यात आली.

 

जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधीनी जळगाव शहरातील कासमवाडी, मासूम वाडी व सम्राट नगर मध्ये मागील तीन दिवसात घडलेल्या घटनेचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, कोणत्याही एका समाजावर अन्याय होता कामा नये याची दक्षता घ्यावी,त्यासोबत जळगाव शहरातील याच परिसरात दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी दोन्ही समाजातील जे कोणी समाजकंटक असतील किंवा कोणी मास्टरमाइंड असेल अथवा राजकीय नेता आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना वेळीच पोलिसांनी अटक करावी व जळगाव शहरात शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी करण्यात आली.

 

 

निवेदनात  दिनांक १७ मे रोजी घडलेल्या घटनेत दोन्ही समुदायातील दगडफेकीला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी, १९ मे रोजी टोपी धारकाला दहा ते बारा तरुणांनी मारहाण केली त्यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली वास्तवीक पाहता त्या घटनेत दाखल पात्र गुन्हा नोंद करून संबंधितांना अटक करावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.

 

 

जळगाव जिल्हा मानियार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्राच्या प्रमुख श्रीमती प्रतिभा शिरसाठ, बहुजन क्रांती मोर्चा चे  सोमित्रो अहिरे, लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, राष्ट्रीय मुस्लि मुस्लिम मंच चे डॉक्टर शाकीर शेख, भारत मुक्ती मोर्चाचे देवानंद , वहिदत ए इस्लामीचे  अतिक अहमद, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे भागवत जाधव, बहुजन क्रांतीचे खुशाल सोनवणे, सिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अन्वर खान, आदिवासी सेना अध्यक्ष योगेश बाविस्कर, आदींची उपस्थिती होती.

 

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, पोलिसां सोबत सामाजिक कार्यकर्त्यांनी खानद्याला खांदा लावून दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावे व पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान सुद्धा केले। या बाबत शिष्टमंडळाने लवकरच सर्व धर्मीय सामाजिक संघटनेद्वारे कॉर्नर मीटिंग घेऊन तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांना कटकारस्थानापासून वाचवण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळा मार्फत फारूक शेख यांनी दिले.

Protected Content