जळगावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिपवरून शहरातील समता नगरातील दोन गटात तणाव निर्माण झाल होतो. यातीत चार जणांनी रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील समता नगरातील चार जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियाच्या टीकटॉक अ‍ॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला. हा व्हिडीओ आज सर्वत्र व्हायरल झाला. हे पाहून शहरातील दुसऱ्या गटातील १० ते १२ जणांचा गट समता नगरात गेल्या काही काळ तणाव निर्माण झाला होते. दोन गटातील वाद असल्याने काही रहिवाशांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, सतीश डोलारे, महेंद्र पाटील, वासुदेव मोरे आदींचे पथके दोन वाहनातून घटनास्थळी पोहचले. पोलीस आल्याचे पाहून तरूणांमध्ये पळापळ सुरू झाली. यात संशयित जुबेर अकील खाटीक (18), जाफर शकील खाटीक (22), अकबर सलीम सैय्यद (18) व अरबाज शकील सैय्यद (19) सर्व रा. समता नगर,जळगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पाच जणांसह इतर तरूणांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चौघा तरूणांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

आक्षेपार्ह मजकूरावर जिल्हा पोलीस यंत्रणेची नजर
सध्या राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यातील कारोनाग्रस्ताची संख्या पाहता लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर जिल्हा प्रशासनाची नजर होती. यात काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात गैरसमजूतीने, अफवेने व आक्षेपार्ह मजकूरमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात रावेर दंगलीचीपार्श्वभूमी पाहता विभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांनी कालच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला होता.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content