जळगाव प्रतिनिधी । अंगात लावलेले दुचाकी अज्ञात माथेफिरूने रॉकेल टाकून जाळून टाकल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, हिना सतिश अभंगे (वय-२८) रा. जाखनी नगर, कंजरवाडा चार महिन्यापुर्वी मोपेड गाडी घेतली होती. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घरासमोर दुचाकी पार्कींग करून लावली होती. रात्री जेवन खावन करून सर्वजण झोपले. घराशेजारी राहणाऱ्या भिमाबाई नाथ यांनी हिना अभंगे यांना आवाज देवून झोपेतून उठवले असता त्यांना दुचाकी जळाल्याची माहिती दिसून आली. यानंतर जळीत गाडीजवळ चार फुट अंतरावर बाजूला कचऱ्याजवळ रॉकेलच्या वासाने दोन प्लॉस्टिक बाटल्या आढळून आल्यात. अज्ञात माथेफिरूंनी रॉकेल टाकून पार्कींगला लावलेले दुचाकी पेटवून दिली. यात दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करीत आहे.