जळगावात महिलेची १९ हजार रूपयात ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । अज्ञात व्यक्तीने कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याची बतावणी करून ओटीपीच्या मदतीने १९ हजार ७५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनिषा नंदलाल जैन (वय-३८) रा. राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर यांचे किराणा दुकान आहे. दुकानाच्या व्यवहारासाठी ॲमेझॉन पे ते वापरत होते. दरम्यान काही तांत्रिका कारणास्तव त्यांच्या मोबाईलमधील ॲमझॉन पे अकाऊंट बंद पडले. २७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. व म्हणाला की, ‘तूमचे फोन पे अकाऊंट बंद पडले आहे, मी कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असून तुम्हाला मी जी लिंक पाठवू ती तुम्ही सर्च करा’. असे सांगितल्यानंतर महिलेचे लिंकद्वारे सर्च केले. त्यानंतर त्यांनी ओटीपी कोड नंबर आल्याने अज्ञात व्यक्ती त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेक करत असल्याचे दिसून आले.

ओटीपी कोड आल्यानंतर त्यांच्या खात्यातून १९ हजार ७५० रूपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

Protected Content