जळगावात महिला डॉक्टरची १७ हजाराची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । डीटीडीसी कुरीअरची मेंबरशिप देण्याच्या बहाण्याने विवाहितेची सतरा हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, डॉ. सायका फारूख शेख (वय-२६) रा. शेरा चौक मेहरूण यांचे मरियन हॉस्पिटल आहेत. ७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता डीटीडीसी कुरीअर कंपनीचे ऑनलाईन मेंबरशिप फार्म त्यांच्या मोबाईलवरून भरला. फार्म पुर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून फोन आला. व सांगितले की, “तुमची डीटीडीसी कुरियरची मेंबरशिप पुर्ण झाली असून मेंबरशिपचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठविला आहे. तो क्रमांक सांगा”. असे म्हटल्यावर डॉ. सायका शेख यांनी चार अंकी ओटीपी क्रमांक दिला. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांना ९ हजार ९९९ आसणि ७ हजार रूपये असे एकुण १६ हजार ९९९ रूपये पिपल्स बँकेच्या खात्यातून कट झाले. याबाबत त्यांनी तत्काळ फोन आलेल्या नंबरवर फोन केला असता कट झालेल्या पैश्यांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉ. सायका शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Protected Content