अपहृत मुलीला बारा तासात ग्रामीण पोलिसांनी शोधले

 

चाळीसगाव, प्रतिनिधी   एका दीड वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती, अवघ्या बारा तासात ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अपहरण करणारी व्यक्ती व मुलीस ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, एका दीड वर्षांच्या अल्पवयीन मुलीस अपहरण केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत रात्री २२:०० वाजता संशयित व्यक्तीविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम ३६३ नुसार फिर्याद दाखल करण्यात आला. सदर फिर्यादी यांनी एका इसमावर संशय व्यक्त केला होता. यानुसार गुन्ह्याची माहिती मिळताच लागलीच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक संपत आहेर, पोहेकॉ. युवराज नाईक, नितीन आमोदकर, गोकुळ सोनवणे, दत्तात्रय महाजन, गोवर्धन बोरसे, जयंत सपकाळे व शांताराम पवार यांनी अपहरण मुलीच्या शोधार्थ न्हावे, तरवाडे, पाटणा, धुळे, मालेगाव व इतर ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता मिळून आले नाही. दरम्यान पोना गोकुळ सोनवणे यांना संशयीत इसम व मुलगी मालेगाव असल्याचे माहिती सुत्रांकडून मिळाली. लागलीच पोहेकॉ युवराज नाईक, पोना गोकुळ सोनवणे व पोना नितीन आमोदकर आदींनी मालेगाव गाठून संशयीत इसम कृष्णा सोनवणे व अपहरण मुलगी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलीसांना यश आले आहे. हि कारवाई पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना/७३१ जयंत सपकाळे हे करीत आहेत.

 

Protected Content