जळगाव प्रतिनिधी । व्याजाच्या पैश्याच्या वादातून तरूणाला नऊ ते दहा जणांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात नऊ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संदीप पुंडलीक नन्नवरे (वय-35) रा. समता नगर, जळगाव हे ४ फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता जिगर अहिरे व त्यांच्यासह इतरांनी घराच्या दरवाजाला लाथा मारून शिवीगाळ व दमदाटी केली. हा वाद जास्त वाढवून नये म्हणून त्यांनी दरवाजा बंद करून घेतला होता. थोड्या वेळाने रामानंद नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली होती. त्याच रात्री १०.३० वाजता जिगर अहिरे, विक्की शिंदे, सागर अहिरे, कैलास शिंदे व त्यांचा मुलगा, कलाबाई अहिरे व तिची मुलगी चिऊ सपकाळे, अहिरे बुवा, प्रसाद महाजन, राहुल सुरवाडे सर्व रा. समता नगर यांनी घरी येवून कुऱ्हाडीने दरवाजा तोडून संदीप नन्नवरे यांची आई कलाबाई नन्नवरे यांच्याजवळील ५ हजार रूपये काढून घेतले. यापुर्वी पाच हजाराच्या व्याजाची रक्कमही देण्यात आली आहे. तरी देखील वरील सर्वांनी संजय नन्नवरे यांना डोक्याला व कपळावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यांना जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात नऊ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.