मध्यप्रदेशच्या सीमेवर जीएसटी चोरीचा प्रयत्न फसला

gst chori

रावेर प्रतिनिधी । सिमेंटच्या पावत्यांमध्ये फेरफार करून जीएसटी चोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आल्याची घटना महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर घडली आहे.

या बाबत वृत्त असे की आतंराज्य वाहतुकीचा टॅक्स न भरता रात्रीच्या अंधारात जीएसटी टॅक्स चोरुन शासनाची दिशाभूल करून जळगाव येथून सिमेंट घेऊन मध्य प्रदेशच्या दिशेने जाता असतांना चोरवड नजिक सापळा रचुन कारवाई केली आहे. यामध्ये एमपी ६८ जी ०४७६ या आयशर गाडीत लोखंडी पाईप तर आर जी ०५ जी ३११५ व एमएच १२ एलटी ३१६९ दोन्ही ट्रकांमध्ये सिमेंट भरलेले आहे. तिन्ही वाहने रावेर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहे अजुन पर्यंत हा टॅक्स चोरीचा खरा सूत्रधार बाहेर आलेला नाही. ही कारवाई जीएसटी विभागाचे श्री गोयल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे

अशी होते कर चोरी

मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यात सिमेंटचे वेग-वेगळे भाव आहे. जळगाव येथील सिमेंटने ट्रक भरल्या नंतर चाळीसगाव आरओ काढला जातो व तो ट्रक चाळीसगाव कडे न जाता आंतरराज्य टॅक्सची पावती न घेता परस्पर मध्य-प्रदेशात पाठवीला जातो. यामध्ये शासनाला लाखो रूपयांचा चुना लागतो. हा प्रकार मागील एक वर्षा पासून सुरु असल्याचे सूत्रां कडून समजते. आता जीएसटी विभागाच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आल्याने यातील सूत्रधार समोर येणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे.

Protected Content