जळगाव प्रतिनिधी । जुन्या वादातून घरसमोर पार्किंगला लावलेले मोपेट गाडीला तीन जणांनी पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उशीरा उघडकीस आला. याप्रकरणी तीन जणांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शुभांगी आतिष सोनवणे (वय-३२) रा. गेंदालाल मिल यांना त्याच्याच मागच्या गल्लीत राहणारे संशयित दानीश खान उर्फ बाबा जाकीर खान हा गेल्या वर्षभरापासून काहीही एक कारण नसतांना घरावर दगड मारणे, विनाकारण शिवीगाळ करणे सुरू होते. या संदर्भात वार्डातील नगरसेवकाला हा प्रकार सांगितल्यानंतर दानीश खान हा माफी मागून घेत होता. तरी देखील वारंवार त्रास देणे सुरूच होत. दरम्यान शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दानीश खान उर्फ बाबा जाकीर खान, दानिश खान शेख हमीद शेख आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी हाता पेट्रोलने भरलेली बाटली मोपेड गाडी क्रमांक (एमएच ११ बीजी ६११३) वर ओतून पेटवून दिली. यात गाडी पुर्णपणे जळाली. याप्रकरणी शुभांगी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात दानीश खान उर्फ बाबा जाकीर खान, दानिश खान शेख हमीद शेख आणि एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि जगदीश मोरे हे करीत आहे.