जळगाव, प्रतिनिधी । अमृत पुरवठा योजनेंतर्गत वाघुर पंपीग येथे ५०० अश्वशक्ती नवीन पंप मोटारसह बसविणे व ३३ केव्ही सबस्टेशन मधील विद्युत देखभालीची कामे तसेच ११६८ मीमी रायझीग मेनवरील एअर व्हॉलचे, स्लुईस व्हॉल बदलविणेचे काम शनिवार दि. २९ रोजी हाती घेत असल्याने शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
शनिवार दि.२९ रोजीचा पाणीपुरवठा रविवार ३० रोजी, दि. ३० रोजीचा सोमवार ३१ रोजी तसेच ३१ मे चा पाणीपुरवठा मंगळवार १ जून रोजी करण्यात येईल अशी माहिती माहिती महापालिकेतर्फे शहर अभियंता यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रविवार ३० रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
खंडेरावनगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण, पिप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, पिप्राळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीका आश्रम, वाटीका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर, टाकीवरील राहिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकीज दुसरा दिवस – नित्यानंद, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग, डी.एस.पी बायपास- तांबापुरा, शामाफायर समोरील पसिरत, डी.एस.पी. टाकीवरुन – जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलजी, महाबळ कॉलनी परिसर, नुतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा इ. भगवाननगर, रामदासनगर, कोल्हे नगर, अबिका सोसायटी , शिवकॉलनी इ. मेहरुण भागातील राहिलेला परिसर मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपूरी परिसर. अयोध्यानगर दुसरा दिवस- सद् गुरुनगर, हनुमाननगर, लिलापार्क,गौरव हॉटेल परिसर.
सोमवार ३१ रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील सानेगुरुजी कॉलनी, पार्वती नगर, शिवराम नगर, यशवंत नगर परीसारातील भाग, श्रद्धा कॉलनी, नंदनवन नगर, चर्चरोड, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी, वाघ नगर,हरी विठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग, समता नगर, स्टेट बँक कॉलनी, धांडे नगर आदी. मेहरूण इकबाल कॉलनी, मिल्लत नगर या भागात पाणीपुरवठा होणार आहे.
मंगळवार १ जून रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, रामेश्वर कॉलनी, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगांव परिसर, तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर व इतर परिसर, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग, आयोध्यानगर पहिला दिवस गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा. जगवानी नगर, मेहरूण पहिला दिवस सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सा नगर, गणेशपुरी, मलिकनगर