जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने दुसऱ्या दिवशी सोमवारी २२ फेब्रुवारी शहरातील अजून हॉटेल, मंगलकार्यालय व रिसॉर्ट मधील हॉल व सभागृहाचे असे चार ठिकाणे सिल करण्यात आले आहे. ही कारवाई सायंकाळपर्यंत राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढायला लागला आहे. शहरातील मंगलकार्यालयात आयोजित केलेल्या लग्नात आणि सार्वजनिक कार्यक्रमात लॉकडाऊन आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी दुपारी शहरातील विविध मंगल कार्यालयात धडक कारवाई करून दिवसभरात १० मंगल कार्यालय सील करण्यात आले. आज सोमवारी दुसऱ्या दिवशी देखील जिल्हाधिकारी यांचे कोवीड संदर्भात असलेल्या आदेशान्वये महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे आणि शेखर ठाकूर या पथकाने दुपारपर्यंत शहरातील एमआयडीसी हद्दीतील बालाणी लॉन्स, गिरणा पंपीग रोडवरील आर्यन इको रिसॉर्ट, प्रभात कॉलनीतील शानबाग बहुउद्देशीय सभागृह आणि हॉटेल रॉयल पॅलेस या चार ठिकाणी कारवाई करत या ठिकाणचे हॉल सभागृह सिल करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/245128520533123