जळगावात दारूड्या पतीने पत्नीला चाकूने भोसकले (व्हिडीओ)

 

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या व्यसनामुळे पत्नी घरात राहू देत नसल्याचा राग मनात ठेवून संतापाच्या भरात चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पतीस जिल्हापेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, रमेश सुर्यवंशी रा. ट्राफिक गार्डन, शाहू नगर हे आपल्या पत्नी सुरेखा रमेश सुर्यवंशी आणि मुलगा महेंद्र रमेश सुर्यवंशी सह राहतात. महेंद्र सुर्यवंशी हा क्यूआरटी विभागात पोलीस कर्मचारी असल्याने शाहूनगर पोलीस वसाहतीत राहतात. रमेश सुर्यवंशी यांना प्रचंड दारूचे व्यसन आहे. त्यामुळे मुलगा व पत्नी यांच्या दारूमुळे भांडण होत होते. गेल्या आठ दिवसांपासून ते एकटे वेगळे राहत होते. आज सकाळी १० वाजता त्यांनी संतापाच्या भरात शहरातील राजकमल टॉकीजच्या परीसरात ३० रूपयाचा घरगुती चाकू खरेदी केला. त्यानंतर गावठी दारू पिऊन चिंग होवून थेट शाहू नगर येथील घर गाठले. पत्नी व मुलगा घरातच होते. ज्यावेळी रमेश सुर्यवंशी घराच्या दारात दारूच्या नशेत आले. त्यावेळी घरातील सर्वजण बेसावध होतो. कोणाचेही लक्ष नसतांना त्यांनी अचानक पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांनी आरडाओरड केल्याने मुलगा महेंद्रच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने आईला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी रमेश सुर्यवंशी यांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/589047955284952/

Protected Content