मराठीचं वाकडं करण्याची कुणाचीही हिंमत नाही- उध्दव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । मराठी भाषा ही जिजाऊंचे संस्कार असणारी असून मराठचं वाकडं करण्याची कुणाचीही हिंमत नसल्याचे प्रतिपादन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ते विधीमंडळात राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आज विधान भवनात सरकारच्या वतीनं मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथ दिंडीनं या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की, भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेनं मराठी भाषा दिन साजरा करू नका, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. विधानभवनात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकंट आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काफ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमणावेळीही मराठी धावून गेली होती?, असं ठाकरे यावेळी म्हणाले. ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Protected Content