गणपती घेण्यासाठी आलेल्या दाेन तरुणांना बँँडवाल्यांकडून अकारण मारहाण

Crime l 1

जळगाव प्रतिनिधी । गणपती घेण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना बँडवाल्यांकडून मारहाण केल्याची घटना आज दुपारी घडली. यात दोघे जखमी झाले असून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीसात अज्ञात 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गणेश चतुर्थी असल्याने दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान शहरातील टॉवर चौकात रोहीत विजय सपकाळे (वय-19) रा. शिवाजी नगर धनाजी काळेनगर हा आपल्या वडीलांसह गणपतीची मुर्ती व इतर सामान खरेदी करण्यासाठी आला होता. त्याचवेळी वाद्य वाजवणारे मुले यांचे भांडण सुरू होते. त्यातील काहींनी काहीही एक कारण नसतांना रोहीत सपकाळे आणि बाजूला उभा असलेला गतीमंद स्वप्निल मंगल सोनवणे (वय-22) याला देखील ढोल मारून दोघांना जखमी केले. यात तसेच 10 ते 15 जणांनी मारहाण केली. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रोहीत सपकाळे याच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content