जळगावात जुगार अड्डयावर धाड

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे सुरू असणार्‍या जुगार अड्डयावर आज पोलिसांनी धाड टाकून ३० पेक्षा जास्त जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

नववर्षाच्या स्वागताला ममुराबादच्या फार्म हाऊसवर बार बालांसह होत असलेल्या पार्टीवर पोलीसांनी धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली होती. यात काही हाय प्रोफाईल मंडळीचा समावेश असला तरी राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई टाळण्यात आल्याची चर्चा रंगली होती. यानंतर आज दुपारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या बाबा प्लाझामध्ये सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणार्‍या जुगार अड्डयावर पोलीसांनी धाड टाकून ३० पेक्षा जास्त जुगार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

नवीन बी. जे. मार्केटसमोरील बाबा प्लाझामधील पहिल्या माळ्यावर माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांच्या मालकीचे कै.केशवराव शिरसाळे क्रीडा मंडळ आहे. या क्रीडा मंडळात पत्ते खेळण्याचा परवाना देऊन मनोरंजनासाठी पत्ते खेळले जातात. दुपारी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बी. जी. रोहम यांच्या पथकाने अचानक क्रीडा मंडळात छापा टाकला. यात विलास पाटील, संतोष महाजन, संदीप चौधरी, अर्जुन सोनार, ईश्‍वर पाटील, श्रीकृष्ण लोहार, चेतन बारी, विकास बागळे, मयूर लोहार, विठ्ठल पाटील, कैलास कोंडवणे, दिलीप जोशी, अब्दुलशाह गबदुलशाह रहेमान, दिलीप शर्मा, योगेश पाटील, आबीदखान शब्बीर, शेख शकील, मोहम्मद कलीम, नागेश दुबे, दिनेश मेढे, नीलेश तंबाखे, किरण सोनवणे, बापू सूर्यवंशी, दिलीप महाजन, यशवंत माळी, पवनकुमार ठाकरे, सुरेश शर्मा, प्रशांत विसपुते, विनोद कासट, भागवत सोनवणे, संतोष पिरमकर, शेख दस्तगीर, किरण जोशी, शेख जाकीर, राकेश हटकर, शेख रफिक, पुरूषोत्तम बाविस्कर, महम्मद याकुब, अनिस पिंजारी, राजेंद्र झोपे, अजितसिंग परिहार, सुभाष खडके, देविदास मगर आदींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Add Comment

Protected Content