जळगाव प्रतिनिधी । घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज वासुदेव भटेजा (वय-३९) रा. सिंधी कॉलनी जळगाव यांचे इलेक्ट्रॉनीक दुकान आहे. दुकानाच्या कामासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ९१७१) चा वापर करत असतात. मनोजने १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकी घरासमोरील कंपाऊंडजवळ पार्कींग करून लावून बाहेर दुसऱ्या दुचाकीने बाहेर निघून गेला. १८ रोजी सकाळी ३ वाजता घरी आल्यानंतर दुचाकी दिसून आली नाही. यावेळी घरातील मंडळींना दुचाकीबाबत विचारले असता काहीही माहिती मिळाली नाही. दरम्यान इतरत्र शोधाशोध सुरू केला असता मिळून न आल्याने एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.