जळगावात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ब्रेन हॉस्पीटलजवळ बेकायदेशी गावठी बनावटीचे पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्या ताब्यातील पिस्टल हस्तगत केली. जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील ब्रेन हॉस्पिटल व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाजवळील चहाच्या टपरीवर संशयित आरोपी नितेश मिलींद जाधव (वय-२१, रा. पिंप्राळा स्मशानभूमी जवळ) हा त्यांच्या ताब्यात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल बेकायदेशीर घेवून “मी जळगावचा दादा आहे, माझे कोणीही काही करू शेत नाही, पोलीस सुध्दा मला घाबरतात” असे म्हणून परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळाली. आज दुपारी ब्रेन हॉस्पिटल परिसरात सापळा रचून संशयित आरोपी नितेश जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस अमंलदार संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नरवाडे, अविनाश देवरे, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, दत्तात्रय बडगुजर, महेश महाजन यांनी ही कारवाई केली.

Protected Content