जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | निरोगी जीवनासाठी योगासन, प्राणायाम गरजेचे आहे. यात सातत्य असणे आवश्यक आहे, असे मत योगशिक्षक सुनील गुरव यांनी व्यक्त केले. तसेच “करो योग, रहो निरोग” चा नारा मेहरूण तलावाजवळील रायसोनी फॉर्म हाऊसच्या हिरवळीवर रविवारी सकाळी आयोजित योग शिबिरात देण्यात आला.
रोटरी क्लब जळगाव रॉयल्स, सन, ओम योगा ग्रूप, माउली योगासन व प्राणायाम वर्ग तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर मेहरूण तलावाच्या निसर्गरम्य परिसरात रायसोनी फॉर्म हाऊसवर या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ त्रिवार ओंकार व गुरु वंदनेने झाला. त्यानंतर योग पूरक मुव्हमेंट, काही आसने, प्राणायाम , ध्यान , रिदमिक योगा , विश्वप्रार्थना आणि हास्य प्रयोग करण्यात आले. तसेच अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते संबंधितांना वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन योग शिक्षिका अर्चना गुरव यांनी केले. या वेळी योग तज्ज्ञ हेमांगिनी सोनवणे , अरविंद सापकर , कृणाल महाजन , डॉ. भावना चौधरी, तसेच रोटरी क्लब जळगाव रॉयल्सचे सचिव सचिन जेठवाणी, सदस्य रवी नाथानी, नारायण लाहोरी, विकास नाथानी, गिरीश शिंदे, सपना नाथानी, कविता लाहिरी आदी उपस्थित होते. १३५ योग प्रेमी या शिबिरात सक्रीय सहभाग घेतला.