जळगाव : प्रतिनिधी । शहरातिल गणेश कॉलनी भागातील एटीएम फोडण्याचा चोराचा प्रयत्न आज सतर्क नागरिकांनी उधळून लावला .
शहरातील गणेश कॉलनी भागात विजय कॉलनीला लागून एच डी एफ सी बँकेचे एटीएम आहे . तेथे शस्त्राच्या मदतीने तोडफोड करून रक्कम पळविण्याचा प्रयत्न आज एकाने केला . तोडफोडीच्या आवाजाने परिसरातील नागरिक सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळावरून संशयित चोराला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले . जिल्हा पेठ पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले आहे . पोलिसांनी ही माहिती बँकेला कळविल्याचे सांगण्यात आले संशयित आरोपी पवन रवींद्र लोखंडे वय 29, रा.गजानन नगर याला ताब्यात घेतले आहे