जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील ममता बेकरीजवळ उभ्या ट्रकच्या १२ हजार ४०० रुपयांच्या दोन बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मानराज पार्क परिसरातील रहिवासी अंकुश जयेश ओसवाल वय ३६ यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचा एम.एच. १८ ए.के. ५०५१ हा ट्रक २३ जुलै रोजी सुप्रिम कॉलनीत ममता बेकरीजवळ आमिन हाईट अपार्टमेंटजवळ उभा होता. ट्रकच्या रात्रीतून दोन्ही बॅटरी चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आला. याप्रकरणी अंकुश ओसवाल यांनी रविवार, ३१ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.