जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील रहिवासी तरुणी शाळेचा गणवेश खरेदी करण्यासाठी फुलेमार्केट मध्ये गेली होती. तेथील दुकानात काम करणाऱ्या भामट्याने तीच्याशी ओळखी करुन गेल्या काही दिवसांपासुन तीचा पाठलाग करीत होता. शाळेजवळ या विद्यार्थींनीचा रस्ता अडवून छेडकाढल्यावरुन आज पिडीतेच्या आईने तक्रार दिल्यावरुन जिल्हापेठ पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, शहरातील मेहरुण येथील रहिवासी विद्यार्थींनी नंदीनीबाई मुलींच्या विद्यालयात इयत्ता आठवीचे शिक्षण घेत आहे. हि विद्यार्थींनी गणवेश खरेदीसाठी फुलेमार्केट मधील विकास स्कुल युनीफॉर्म या दुकानात गेली होती. तेथे काम करणाऱ्या ऋुषीकेश श्रीराम सोनवणे याने तीच्याशी बळजबरी बोलण्याचा प्रयत्न करुन ओळखी केली होती. त्यानंतर सतत तो, या मुलीच्या मागावर राहत होता. शाळेतून घरी जाण्या पर्यंत हा भामटा तिचा पिच्छा करीत असल्याने मुलीच्या पालकांनी त्याची एकदा समजुत काढली. मात्र, उलट त्याने मुलीच्या पालकांनाच धमकावले होते. नंदिनीबाई शाळेजवळ या भामट्याने पुन्हा मुलीस अडवून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पिडीतेच्या आईने आज जिल्हापेठ पोलिसठाण्यात तक्रार दिली. निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पथकाने संशयीत ऋुषीकेश श्रीराम सोनवणे याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून सरंक्षण अधिनीयम -2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.