जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ परिसरातील काट्याफाईल येथून सेल्समनचे काम करणारे जमीर अहमद शेख रशिद (वय-४०) हे कोणाला काहीही न सांगता ३० डिसेंबर रोजीपासून बेपत्ता झाले आहे. भावाच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शेख नविद शेख रशिद (वय-४२) रा. काट्याफाईल शनीपेठ हे रिक्षा चालक असून त्यांचा लहान भाऊ जमीर अहमद शेख रशिद हे गांधी मार्केट मधील दुकानावर सेल्समनचे काम करतात. ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता घरात सर्वजण झोपलेले असता जमीर अहमद हे कुणाला काहीही न सांगता घरातून बाहेर पडले. दिवसभरात घरी न आल्याने कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. ते मिळून न आल्याने शनीपेठ पोलीस ठाण्यात भाऊ नविद शेख रशिदे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.