जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वेस्थानक रोडवर पार्किंगला लावलेली मालवाहू ॲपे रिक्षा अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू पुतळा ते रेल्वेस्टेशन दरम्यानच्या रोडवर बालाजी मार्केटिंग नावाचे दुकान आहे. विलास सुंदरलाल पोरवाल (वय-५७, रा. द्रोपती नगर) यांचे हे दुकान आहे. याठिकाणी पेप्सीसह किरकोळ विक्रीचे काम केले जाते. यासाठी त्यांच्याकडे मालवाहू ॲपे रिक्षा क्रमांक (एमएच १९ डब्ल्यू ०२२०) क्रमांकाचे वाहन आहे. या वाहनावरून किरकोळ माल ने-आण करण्याचे काम करतात. दरम्यान शनिवार ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दुकानासमोर ॲपे रिक्षा पार्किंग करून लावली होती. आज सोमवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान मालक विलास पोरवाल हे दुकानावर आले असता त्यांना पार्किंगला लावलेली मालवाहू रिक्षा दिसून आली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली असता रिक्षा मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान सीसीटीव्हीत अज्ञात चोरटा कैद झाला असून आज सकाळी ६.२० ते ६.४० वाजेच्या दरम्यान रिक्षा चोरून नेल्याचे दिसून येत आहे. पोरवाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.