जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांचे एक दिवसीय संप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी केंद्र सरकारने व राज्य सरकारने अव्यवहारीक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग व एचयुआयडी विरोधात आज सोमवार २३ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला.  

सोन्यावर हॉलमार्किंग प्रक्रियेच्या विरोधात आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारुन दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी व्यापारी बांधव म्हणाले की, हॉलमार्कचे आम्ही स्वागत करतो, परंतु अव्यवहारीक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग पद्धतीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र भर ज्वेलर्स, सराफ व सुवर्णकार ब्युरो ऑफ इन्वेस्ट इन स्टॅंडर्ड -१ नुसार त्रासदायक जाचक प्रक्रिया, ज्वेलर्सचे कोणतेही ओळख चिन्ह नाही, तसेच दागिन्यांची सुरक्षितता नाही, सोन्यावर हॉलमार्किंग केल्यानंतर दागिन्यांमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. जळगाव शहर सराफा असोशिएशन एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

सराफ व्‍यावसायिकांनी पुकारलेल्‍या बंदमध्‍ये जळगाव शहरातील १५० तर जिल्हाभरातील २ हजार सराफा व्यवसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.  यात अध्यक्ष गौतम लुनीया, उपाध्यक्ष अजय ललवाणी, सचिव स्वरुप लुंकड  यांच्या माध्यमातून सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे.  यावेळी प्रविण छाजेड, धनेश वर्मा, उत्तर लुनिया, बाळासाहेब खारोडे आदी सराफा व्यावसायिक उपस्थित होते. 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/171532584983881

 

Protected Content